साकोलीत युवक बिरादरी ( भारत ) तर्फे “एक सुर एक ताल”…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

         साकोली : युवक बिरादरी (भारत) भंडारा जिल्हा तर्फे “एक सुर एक ताल” कार्यक्रमाचा सुवर्ण जयंती सोहळा अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कुल (एकोडी रोड) साकोलीत मंगळवार ०२ जुलैला आयोजित करण्यात आला.

          कार्यक्रमात विशेष अतिथी सरिता फुंडे – अध्यक्ष युवक बिरादरी भंडारा जिल्हा, प्रोजेक्ट संचालक सचिन वाकुळकर, साकोली पोलीस अधीक्षक कसोधन, डॉ. राजेश चंदवानी – अध्यक्ष समर्पन बहुउद्देशिय विकास संस्था साकोली, सचिव डॉ.गिता चंदवानी, कोरिओग्राफर अतुल सर ,शाळा व्यवस्थापक जी. एच. ठाकरे, प्राचार्या सहारे आशिर्वाद नर्सिंग कॉलेज साकोली यांच्या प्रमुख उपस्थितीत “एक सुर एक ताल” कार्यक्रमाचा सुवर्ण जयंती सोहळा साजरा करण्यात आला. 

           कार्यक्रमाचे अतिथी गणाचे स्वागत एच.एम.रिना फ्रॅन्सिस, स.शि. अमिताज कौर, सारिका ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

          कार्यक्रमात अतुल सर ह्यांनी आपल्या संगितमय तालासुरात गितगायन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. तर सरिता फुंडे ह्यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट विषयी जाणकारी दिली.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका डॉ.संचिता ब्रम्हचारी ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गिता चंदवानी ह्यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी सहकार्य केले.