भद्रावती शहरात्त डेंग्यू आजाराविषयी लक्ष केंद्रित करावे… — आरोग्य विभागाकडुन नगर परिषदेला सूचना…

       उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती 

            दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि वातावरणात बदल निर्माण होत असतो, त्यामुळे रोगराई तसेच साथीच्या आजाराला सुरवात होते. त्यात जलजन्य तसेच कीटकजन्य रोग कावीळ, गॅस्ट्रो, टाइफाइड , डेंग्यू , मलेरिया, चिकणगुण्या, हत्तीपाय, सारख्या आजाराला सुरवात होऊन रुग्नांचे प्रमाण वाढत जाते, हि स्थिती पाहता पावसाळ्यापूर्वी भद्रावती शहरात्त डेंग्यू ने थैमान घालण्यापूर्वी नगर परिषदेने याकडे लक्ष केंद्रित करुन सहकार्याची अपेक्षा आरोग्य विभागाने शासकीय सेवेत असलेल्या न.प. भद्रावती ला केली आहे. 

          डेंग्यू साथीचा आजार होऊ नये, या करिता नगर परिषद प्रशासनाने शहराच्या प्रत्येक प्रभागात फॉगीन मशिनद्वारे धूर फवारणी करने, नाल्या, गटारे, साफसफाई तसेच नालीमध्ये ऑईल फवारणी करावी.

            पाण्याची टाकी नियमित थियटर फिल्टर टेस्ट करून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करावे, इतरत्र पाण्याने साचलेले घाणेरडे गड्डे यावर फवारणी करणे,व्हेंट पाइप वर जाळी लावने, ज्या ठिकाणी डेंग्यू चे रुग्ण असतील त्या ठिकाणी आपल्या चमूसह जाऊन डेंग्यू चा उद्रेक होऊ नये याकरिता जण जागृती मोहीम राबवून उपाय योजना करावी. या साथीच्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने शासकीय सेवत असलेल्या नगर परिषदेला सहकार्याची अपेक्षा केली आहे.