कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी::- पारशीवणी तालुक्यातील सोनेगाव येथील शेतकरी किसन महागु मेश्राम यांचे गरंडा शिवारात शेत आहे.त्या शिवारातील शेतात जनावरांसाठी त्यांनी गोठा बांधला आहे.
नेहमी प्रमाणे ते २७ जुन २०२४ ला सायंकाळी आपल्या जनावरांना गोठ्यात बांधुन घरी आले.दुसऱ्या दिवशी २८ जुनला सकाळी आपल्या जनावरांच्या संगोपनासाठी गेले असता एक बकरा आढळला नाही.
त्याच्या इतरत्र शोधाशोध घेतला असता बकऱ्याला बिबट्याने खाल्ल्याने अर्धवट अवस्थेत दिसून आलाय.गोठ्याचे कुंपण तोडून आत जाऊन बिबट्याने बकऱ्याची शिकार केली. तसेच बिबट्याच्या पाऊल खुणा दिसून आल्या.
मात्र त्याच दिवशी २८ जुन ला दमदार पाऊस झाल्याने पाऊल खुणा मिटल्या गेल्या.याची माहिती पारशीवणी वनविभागाला देण्यात आली.मात्र जास्त पाऊस झाल्याने शेतात जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने पाहणी होऊ शकली नाही.
मात्र नंतर वनविभागाने दखल घेत पंचनामा करण्याची तयारी दर्शवली असून त्यात शेतकरी किसन मेश्राम यांचा बकरा जवळपास २०,००० ( वीस हजार) रुपयाचे नुकसान झाले असून सबंधित विभागकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.