कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी :तालुक्यातील भागीमहरी-पेंढरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेंढरी गांव येथे तहसिल कार्यालय मार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रम तहसिलदार तर्फे आयोजीत शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत शासन मार्फत भागीमहारी ग्राम पंचायत अंतर्गत पेंढरी गांव येथे तहसिल कार्यालयाचे विविध विभागाचे कर्मचारी महसुल विभाग, संजय गाधी निराधार योजना, पुरवठा विभाग सेतु विभाग, खंड विकास अधिकारी यांचे कार्यालय मार्फत विविध योजना कृषी विभाग, शिक्षण, पशु वैद्यकिय, मनरेगा, घरकुल, पोलिस विभाग क्षेत्रातील सर्व बँक व्यवस्थापक यांची टिम सह सर्व विभागाची टीम हजर होऊन श्रेत्रातील शेतकरी, विधवा, कृषी विभाग, बँक, तलाठी, सेतु सह अनेक आवश्यक नागरिकाचे कामे करण्यात आली.
आयुष्यमान भारत, सिकलसेल, आधार कार्ड, दिव्यांगासाठी शासकीय योजना, प्रत्येकांना घरकुल योजना, अन्न खाद्य शासकीय योजनेची माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी गट ग्राम पंचायत भागीमहारी पेंढरी गावातील सरपंचा ज्योती प्रेम भोडेकर, ग्राम सचिन मोरेश्वर शेंडे तहसीलदार राजेश भांडारकर, नायब तहसिलदार प्रकाश हारगुळे, अन्न पुरवठा निरीक्षक स्नेहल देशमुख, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मनोज मानमोडे, पोलिस अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, पं.स. चे कार्यक्रम अधिकारी देशमुख, प्रेम भोंडेकर, सचिव मोरेश्वर शेंडे, ग्रा.प. चे सर्व सदस्यगण, कर्मचारी. महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी, मदतनीस, महिला बचत गटाच्या सदस्या तसेच ग्रामस्थ सकाळी १० बाजता पासुन ते ४ बाजे प्रयत मोठ्या संख्येने गावकरी शेतकरी पेंढरी गावात शिविरात उपस्थित होते.