जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे जि.प.नागपुर यांनी केले गरंडा शाळेतील चिमुकल्यांचे स्वागत… — चिमुकल्यांनी बहरला शालेय परिसर…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

पारशिवनी :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे जिल्हा परिषद नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांनी भेट देऊन इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

          याप्रसंगी पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती मंगला उमराव निंबोने, उपशिक्षणाधिकरी निखिल भुयार, जिल्हा परिषद पी एम ओ अखिल बडवाइक, पंचायत समिती सदस्य संदीप भलावी, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, ग्राम पंचायत सदस्य अश्विनी गजभिये, भारती मोरकूरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रावण मोंढे, उपाध्यक्ष व्यंकटी कोहळे, सदस्य माया बोंबले, रेश्मा बावणे, रिना क्षीरसागर, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, मदतनीस चंद्रकला गजभिये, स्वयंपाकी प्रिया मेश्राम, युवा प्रतिनिधी सृष्टी क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते.

         शैक्षणिक सत्र २०२४ – २५ चा शुभारंभ आज करण्यात आला. सभापती मंगला उमराव निंबोने यांनी मुलांना पेन्सिल व खाऊ देऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.याप्रसंगी वियार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी केले.