एकाच रात्रीतून तीन मंदीरातील दानपेट्या फोडून रोख लंपास… — दर्यापूर पोलीसात गुन्हा दाखल…  — दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद..

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

      दर्यापूरातील ६४ जीन प्लाँट परीसरातील थोड्या-थोड्या अंतरावर असणाऱ्या तीन मंदीरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी २४ हजाराची रोखरक्कम लंपास केल्याची घटना रविवार (दि.३०) मध्यरात्री दरम्यान घडल्या आहेत. घरफोडी, चोऱ्यांचे संत्र सुरु असतांना चोरट्यांनी थेट भरवस्तीतील तीन मंदीरांमध्ये चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            दर्यापूरातील शासकीय रुगणालयाला लागून असेलल्या गणेशलक्ष्मी मंदीराचे मुख्य कुलूप तुटलेले अवस्थेत मंदिराच्या व्यवस्थापकाल पहाटे दिसून आले. आत जावून बघितले असता मंदीरातील दानपेटीचे सुद्धा कुलूप तुटलेले दिसले व १५ हजाराची रक्कम चोरी झाल्याचे समोर आले.

          दुसऱ्या घटनेत श्री सचिदान्नंद सदगूरु साईबाबा मंदीरातील दानपेटी फोडून अंदाजे ५ हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. तीसऱ्या घटनेत साईबाबा मंदिराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या रामदेवबाबा मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ४ हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.

          तीन मंदीरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी एकूण २४ हजाराची रक्कम लंपास केली आहे. या तीनही चोरी प्रकरणी फिर्यादी देवेंद्र धांडे यांच्या तक्रारीवरुन दर्यापूर पोलीसांनी अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल केला आहे. सिसीटिव्ही फुटेज मध्ये दोन संशयीत युवक दिसून आले आहे त्याआधारे पुढील तपास सुरु असल्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी सांगितले.