ऋषी सहारे
संपादक
एक पेड माँ के नाम, Plant4Mother ही संकल्पना राबविण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने वनमहोत्सव कालावधीत अमृत वृक्ष आपल्या दारी या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
वनमहोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. तसेच प्राप्त दुरध्वनी संदेशाद्वारे “एक पेड माँ के नाम”,Plant4Mother ही संकल्पना राबविणे तसेच त्याचा अहवाल केंद्र शासनास सादर करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
“एक पेड माँ के नाम”, Plant4Mother या उपक्रमाअंतर्गत सर्व स्तरावर जे रोपवन झाले आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या संदर्भात Plant4Mother या उपक्रमांकरीता राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे ज्या मध्ये “एक पेड माँ के नाम”,Plant4Mother असे Background Banner असलेली सुस्पष्ट छायाचित्रे सादर करणे आहे.
त्या अनुषंगाने सिर्सी क्षेत्रात “एक पेड मा के नाम” वर बोरी डार्ली नरोटी चक व शिरसी या ठिकाणी झाड लावण्यात आले.
यावेळी डब्लू एम बोगा क्षेत्र सहाय्यक शिर्शी, ऋषी सहारे पत्रकार, श्रीकांत सेलोटे वनरक्षक बोरी, मुकेश सयाम वनरक्षक नरोटी, धनराज कुळे वनमजूर, धुधराम ठाकूर, दामोधर नवघरे वनमजूर देवानंद उरकुडे, रवींद्र सहारे उपस्थित होते.