युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नजिकच्या लांडी येथे रोडच्या कामासाठी आणलेली गिट्टी अद्यापही रोडवर पडून असल्याने गावातील नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे.
ज्या ठिकाणी रोडच्या कामासाठी गिट्टी टाकली तो रस्ता गावातील रहदारीचा मुख्य रास्त असून या रस्त्याने गावातील नागरीक, विद्यार्थी येणे जाणे करतात तसेच गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेतीच्या कामासाठीही याच रस्त्याने रहदारी करावी लागते.
मात्र या मुख्य रस्त्यावर रोडच्या कामासाठी ठेकेदाराने मागिल चार महिन्यापासून गिट्टी आणून ठेवली असून अद्यापही कामास सुरुवात केली नाही. मात्र रोडच्या कामासाठी आणलेली गिट्टी अजूनही संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तशीच पडून असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.पावसाळ्याचे दिवस असुन एखादी अनुचित घटना घडल्यास यास कोण जबाबदार राहील ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.