निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल :- राजू झोडे

 प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

         महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करणारा आहे अशी टीका बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

         अर्थसंकल्पातून सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं दिसून आले. एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था उभी करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न हे दिवास्वप्न राहणार आहे.

          काही योजना या आपली कंत्राटं कायम राहावीत यासाठी केल्या असल्याची टीका राजू झोडे यांनी केली आहे.

          ते म्हणाले, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. महिन्याचा अर्थसंकल्प म्हणजे युवकाना विकासाच गाजर दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची टीका झोडे यांनी केली.