नागसेन वन बुद्ध विहार येथे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांची जयंती करण्यात आली साजरी.

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

        नागसेनवन बुद्ध विहार व संथागार फॉउंडेशन नागपूर द्वारे नागसेन नगर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती करण्यात आली. 

        10 वी व 12 वी मध्ये 60 टक्क्याच्या वर मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संथागार फॉउंडेशन द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र देऊन करण्यात आला.

        या प्रसंगी डॉ.एम.एस. वानखेडे,आयु मनीषा पाटील,जया कलीहारी,सुनंदा गायकवाड यांनी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.

        त्या नंतर एम.एस.जांभुळे लिखित व डॉ.वीणा राऊत यांनी दिग्दर्षित “संविधान जागर लघु नाट्य सादर करण्यात आले. 

        या कार्यक्रमा साठी संविधान जागर टीम,एम.एस. जांभुळे,डॉ.वीणा राऊत,डॉ.एम एस वानखेडे,मंगला जांभुळे,जया कलीहारी,सुनंदा गायकवाड,नंदा पंचभाई,मनीषा पाटील,गुम्फा पाटील,नंदा पंचभाई तसेच आयु. अनिता मेघराज वानखेडे,दर्शना मेश्राम,सिद्धार्थ महाजन,आयु वंदना यशवंत भांबूलकर व आयु. फुलझेले साहेब दिघोरी यांनी सहकार्य केले. 

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयु.सूरज भोवते,आयु.साखरे साहेब अध्यक्ष बुद्ध विहार,बागडे साहेब व बुद्ध विहार कमिटीतील उपासक व उपासकांनी खूप परिश्रम घेतले.