कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवसा निमित्त पोलीस स्टेशन पारशिवनीच्या प्रागणात तसेच बाजार चौक पारशिवनी येथे अमली पदार्थ संबंधाने मार्गदर्शन करून अंमली पदार्थ विरोधात पोलीस स्टेशन पारशिवनीच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
लोकांना अंमली पदार्थांच्या सेवन टाळावे,त्यापासून होणारे दुष्परिणाम,अमली पदार्थ संबंधाने मार्गदर्शन करून अंमली पदार्थ विरोधात जनजागृती केली.
तसेच मादक पदार्थांची ओळख आणि प्रकार, NDPS कायदा,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा,मानसिक आजार म्हणून व्यसन,प्रक्रिया,व्यसनमुक्तीसाठी उपाय या विषयांवर लोकांनी अंमली पदार्थांच्या सेवन टाळावे,त्यापासून होणारे दुष्परिणाम या बाबत जनजागृती केली.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात,पो.उप.नि. शिवाजी भताने,सहायक फौजदार देवानंद उकेबोनद्रे,पोलीस पाटील महादुला शुभम पटले,पोलीस स्टेशन पारशिवनीचे गोपनिय विभागाचे पो.हवा.पृथ्वीराज चौहान,राकेश बंधाते,विरेन्दसिंह चौधरी,हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.