भंडारा येथे एकीकृत रिपब्लिकन समितीची स्थापना…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

       भंडारा-आज दिनांक 26 जून 2024 ला छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून एस डी महाविद्यालय साई मंदिर च्या बाजूला भंडारा येथे विविध रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

         या बैठकीमध्ये सर्वानुमते रिपब्लिकन एकीकृत समिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले. ही समिती सध्या तात्पुरती असून या समितीचा व्याप अवघ्या काही दिवसातच वाढवण्यात येणार असून त्यात सर्वानुमते एकीकृत रिपब्लिकन समिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले.

         मुख्य संयोजक अमृत बनसोड, जिल्हाध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे , मुख्य निमंत्रक रोशन जांभुळकर,जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वानखेडे ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भिवगडे ,जिल्हा उपाध्यक्ष राजेश मडामे , जिल्हा महासचिव असित बागडे ,जिल्हा सचिव प्राध्यापक रमेश जांगडे,जिल्हा मीडिया प्रमुख संजीव भांबोरे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोब्रागडे ,सदस्य विजय भोवते, अशा प्रकारे कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे, ईश्वर नंदागवळी ,देविदास नेपाले ,श्रीराम बोरकर, समाजभूषण सूर्यभान हुमणे, समाजभूषण महेंद्र कुमार गोंडाणे ,समाजभूषण कार्तिक मेश्राम ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.