पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच विविध समित्या जाहिर करण्यात आल्या. त्यात देसाईगंज तालुका समन्वय व पूनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी विलास ढोरे यांची निवड करण्यात आली.
सदर नियुक्ती गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबतचे नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी नुकतेच दिले आहेत.
समन्वय व पुनर्विलोकन समितीत अध्यक्षांसह ६ सदस्य असणार असून यात सदस्य म्हणून नरेंद्र सहारे, गोपाल उईके कसारी, सौ. बेबीनंदा पाटील, कैलास दिघोरे पोटगांव, संजय डोंगरवार विसोरा व अनिल मस्के कोरेगांव आदींची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
वरील नियुक्तीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, चिमुर-गडचिरोली लोकसभा प्रमुख किसन नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुका अध्यक्ष सुनिल पारधी (ग्रामीण). सचिन खरकाटे (शहर), जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, माजी नगराध्यक्ष शालुलाई दंडवते, माजी नगरसेवक राजु जेठानी यांना दिले आहेत.
नियुक्ती बद्दल सर्वच सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.