मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळेत शिंगणापूर शाळा दर्यापूर तालुक्यातून प्रथम…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

         मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये दर्यापूर तालुक्यातून जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिंगणापूर मूले ही शाळा प्रथम आल्या बद्दल आज दि 26/6/2024 ला बचत भवन दर्यापूर येथे मुख्याध्यापक सभे मध्ये संतोष घुगे गटशिक्षणाधिकारी पं. स दर्यापूर यांच्या हस्ते जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिंगणापूर मुले च्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका शीला गोपाळराव आठवले यांचा शाल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

           तसेच जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा दारापूर च्या शाळेचा द्वितीय क्रमांक आल्या बद्दल उच्च श्रेणी मुख्याध्यापक साबीर सर यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तृतीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जैनपूर चा आल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद डोगरदिवे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी पंचायत समिती दर्यापूर चे शिक्षण विस्तार अधिकारी राजेश निंभेकर, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी जाधव गट समन्वयक सुनिल स्वर्गीय,तसेच सर्वं केंद्रप्रमुख, तसेच सर्वं शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मंडळी,विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.