युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी सुरु आहे. यात काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.
दर्यापूर येथे अजित १५५ बियाणे कृषी केंद्र वाले सांगत आहेत कि अजित बियाणे उपलब्ध नाही. पण तेच बियाणे खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री होत आहेत. मग हे बियाणे कुठून आले? कोणाकडून आले? अश्या काळाबाजार करणारे कृषी केंद्र यांच्या विरोधात (24) रिपाई आठवले गट दर्यापूर तालुकाध्यक्ष हरिदास खडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
कापसाचे बियाणे विक्रीसाठी आणले जातात. मात्र यातील काही बियाणे हे बोगस निघत असून शेतकऱ्यांची यात फसवणूक होत असल्याने नुकसान होत आहे.
तालुकक्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून आता बियाणे घेऊन पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी बियाणांची काळाबाजार करून चढ्या दराने सर्रास विक्री होत असून त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपाई गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रशासनाने बियाणे विक्री करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली नाही,तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याच्या इशारा आज रिपाई आठवले गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
निवेदन देतेवेळी दर्यापूर अध्यक्ष रिपाई हरिदास खडे उपाध्यक्ष शशिकांत आठवले सचिव राजेश आठवले सहसचिव अमोल गावंडे संदीप इंगळे कोषाध्यक्ष, चंदू रायबोले वंचितचे पदाधिकारी व शिलवंत रायबोले दादाराव इंगळे उपस्थित होते.