ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली: येथील नवतलाव ( जमनापुर रोड ) साकोली येथे पाच ते दहा एकर जागेवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याबाबत आता साकोलीवासीयांनी सोमवार २४ जूनला जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले व हे अवैधरित्या अतिक्रमण सात ( ०७ ) दिवसाचे आत हटवा अन्यथा जनतेने आंदोलनाचा व उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साकोली येथील नवतलाव परिसरालगत ( कटकवार शाळेजवळ ) जागेवर काही असामाजिक तत्वांनी अदाजे ५ ते १० एकर जागेवर शासकिय भुखंडावर अवैध अतिक्रमण करून ती जागा स्वतः व काही परजिल्हातील लोकांना विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. अतिक्रमणे हटवुन सार्वजनिक कार्यासाठी मोकळी जागा करून देण्यात यावी.
भविष्यात साकोली जिल्हा झाल्यास शासकिय कार्यालय, म्हाडा कॉलनी, किंवा विविध जनहितार्थ उपयोगी ती नवतलाव परिसरातील जागा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. साकोली नगरवासीयांचे असे निर्देशनात आले की, एका व्यक्तीने स्वतः करिता ती अतिकमीत जागा करून उर्वरीत जागेवर परजिल्हातील लोकांना असामानिक तत्वाचे विकण्याचा गोरखधंदा सुरू केलेला आहे. तरी निवेदनावर यथाशिघ्र निर्णय घेवुन व नगरवासी यांच्या भावनांचा आदर करून त्वरीत झालेले अवैध अतिक्रमण हटविण्यात यावे.
सदर अतिक्रमण सात ( ०७ ) दिवसाचे आत न हटविल्यास साकोली नगरवासीयांकडुन तिव्र आंदोलन करुन उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल याची दखल घ्यावी असे निवेदन सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह सादर करण्यात आले.
यात निवेदन धारकांना अतिक्रमण करणारे असामानिक तत्वांकडुन जिवीत हाणी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असेही नमूद केले आहे. यामध्ये यांनी प्रतिलीपीत जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी साकोली, तहसिलदार साकोली, व मुख्याधिकारी नगर परिषद साकोली व पोलीस निरीक्षक यांनाही पत्र दिले आहे.
स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करतांना प्रकाशराणा मेश्राम, शरद कापगते, ग्यानीराम गोबाडे, विष्णू रणदिवे, विकास परशुरामकर, नरेंद्र वाडीभस्मे, विवेक राऊत, नंदकिशोर गेडाम, पंकज वासनिक, विनायक देशमुख, किशोर पोगडे, मोहन बोरकर, ओमप्रकाश गायकवाड, इमरान खान, इमरान पठाण, दिपक थानथराटे, पप्पू पठाण, सुरेश बघेल, राकेश सिडाम, विक्की गणविर, वृषभ तांडे, प्रमोद गजभिये, मोनिष खान, सतिश लांजेवार, कुंदन वल्के, महेंद्र जनबंधू, अनिल गुप्ता, सुरेश संग्रामे, संदीप गुप्ता, आशिष चेडगे, राशिद कुरैशी, जे. डी. मेश्राम यांसह बहुसंख्य साकोली शहरवासी हजर होते.
“साकोली शहरातील सामाजिक एकोपा व शांतता कायम ठेवण्यासाठी असामाजिक तत्वांनी केलेले अतिक्रमणे त्यात परप्रांतीय अन्य जिल्ह्यांतील तडीपार गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले अतिक्रमण तातडीने हटवून साकोलीत शांतता कायम ठेवावी अन्यथा आम्ही सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे”.