अनुभवसिद्ध आख्यान म्हणजे देवरायांच्या अभ्यासातला मैलाचा दगड आहे :- डॉ.अरुणा ढेरे — डॉ.अर्चना जगदीश यांच्या “देवराई आख्यान” या निसर्ग संरक्षण परंपरांचा मागोवा सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : जगभरातील माणसांनी निर्माण आणि जतन केलेल्या निसर्ग संरक्षणाच्या परंपरांची ओळख करून देत असतानाच या परंपरांचा आदर करत पर्यावरण विषयक नव्या आव्हानांना सामोरे कसे जाता येईल, याचे विचार करणारे अनुभवसिद्ध आख्यान म्हणजे देवरायांच्या अभ्यासातला मैलाचा दगड आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलनाध्यक्ष डॉ.अरुणा ढेरे यांनी केले आहे.

          प्रफुल्लता प्रकाशनाच्या माध्यमातून डॉ.अर्चना जगदीश यांच्या तीन दशकांच्या अभ्यास व प्रत्यक्ष कामावर आधारित देवराई आख्यान या निसर्ग संरक्षण परंपरांचा मागोवा सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.अरुणा ढेरे यांच्या हस्ते आले. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ.अर्चना जगदीश, जयंत सरनाईक, गुलाबराव सपकाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी देशपांडे यांनी केले.

          अर्चना जगदीश यांचा हा ग्रंथ पर्यावरण क्षेत्रातले देवरायांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा आहे. माणूस व सृष्टी यांच्या आदिम नात्यातून निर्माण झालेल्या आणि संस्कृतीच्या अति दिर्घ प्रवासातही टिकून राहीलेल्या या पवित्र वनांमागच्या लोकधारणांचा आसेतुहिमाचल वेध या ग्रंथातून अर्चना जगदीश यांनी घेतला आहे असे मत डॉ.अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले आहे.