लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनास उस्फूर्त प्रतिसाद, तर विविध योगासने घेऊन योग दिन साजरा…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

       पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे 1 जून 2024 हा आंतरराष्ट्रीय योग दिन लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात विविध योगासने घेऊन साजरा करण्यात आला. 

        यावेळी विद्यालयाचे तज्ञ योगाभ्यासक लवटे सर, गणगे सर यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्सफूर्त पणे सहभाग नोंदविला.

        तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर, माजी सरपंच तथा साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके व माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके यांनी विद्यार्थ्यांना योगासनातील व्यायामाचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले.

         याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.