
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – वाढता प्रदूषण व तापमानावर मात करण्यासाठी वृक्षारोपणातून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर व लक्ष्मीताई सावरकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष जयाताई भुरे यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
वनवा व अनेक कारणांमुळे झाडे नष्ट होऊ लागली आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका वाढला आहे. उष्णता वाढत आहे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे हि बाब लक्षात घेऊन वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिला राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र क्र.1 येथे राबविण्यात आला व रोपाचे संगोपन करण्याचाही संकल्प करण्यात आला.
यावेळी राजू हटवार ,सुजित टेंभुर्णे ,शीलादेवी वासनिक, प्रमिला उईके ,श्रीमती घोडीचोर, श्रीमती टेंभुर्णे ,सौ रामटेके, सौ हटवार, व महिला उपस्थित होत्या.