समर्थ महाविद्यालयात जागतिक योग दिवस संपन्न…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा                      

       राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालयाचे भव्य क्रीडांगणावर 10 वा जागतिक योग दिवस कार्यक्रम घेण्यात आला. पतंजली योग समिती लाखनी आणि समर्थ महाविद्यालय लाखनीच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 जून रोजी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते डॉक्टर नरेशजी चारमोडे सुनील भाग्यवानी इत्यादी उपस्थित होते.

          पतंजली योग समितीचे सुनील भाग्यवानी यांनी प्रात्यक्षिकासह उपस्थित योग साधकांना योगा विषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ.नरेश चारमोडे यांनी सुद्धा उपस्थितांना चुंबक चिकित्सा आणि योगा याविषयी माहिती दिली डॉ चंद्रकांत निंबार्ते यांनी सुद्धा उत्कृष्ट स्वास्थ्यासाठी आहाराचे महत्त्व सांगितले. योग दिनाच्या निमित्ताने सप्ताहभर कार्यक्रम पार पडले.

         जनजागृतीसाठी लाखनी सावली आणि मुरमाडी या भागातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जवळपास 100 योग साधक यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. याप्रसंगी समर्थ महाविद्यालय लाखनी तर्फे योग साधकांच्या सत्कार करण्यात आला. योग दिवस कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व घटक तसेच लाखनी परिसरातील योग साधक बहुसंख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ धनंजय गिरीपुजे आणि आभार राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्राध्यापक बाळकृष्ण रामटेके यांनी व्यक्त केले.