
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज – कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या 5 जुन रोजी झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामदास मसराम (कॉंग्रेस नेते) व मित्र परिवार यांच्यातर्फे “भव्य आरोग्य तपासणी, मोफत औषध वाटप, भव्य रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी तथा मोफत चष्मे वाटप शिबीर चे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदास मसराम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तुमचे आरोग्य संवर्धन हेच आमचे धोरण याउदाक्त हेतूने शनिवार दिनांक 22 जुन 2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी येथे सकाळी 11.00 ते 3.00 वाजता पर्यंत करण्यात आलेली आहे.
सदर आरोग्य शिबिरात शुअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जामठा नागपूर तथा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या तज्ञ डॉक्टराकडून तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात हृदयरोग तज्ञ कडून तपासणी, हाडांच्या तज्ञकडून तपासणी, सामान्य रोगांची तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत औषध वाटप, मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी, चष्मे वाटप, ई.सी.जी इत्यादी तपासणी व वाटप करण्यात येणार असल्याची मसराम यांनी पत्रपरिषदेत दिली.
अधिक माहिती करीता सागर वाढई, जावेद शेख, राजु कुरेशी, दुशात वाटगुरे, धर्मराज घोरमोडे, लंकेश ढोरे आदींशी संपर्क साधावे असेही मसराम म्हणाले.
पत्रपरिषदेला माजी प.स. सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितिन राऊत, अरुण कुंभलवार, सागर वाढई, मोरू मोहुर्ले, राजुभाऊ रासेकर, जावेद शेख, राजु कुरेशी, सावंगीचे माजी सरपंच राजेंद्र बुल्ले, उपसपंच सुमन मेश्राम, कोंढाळा ग्रा.प. सदस्य प्रमोद पत्रे, हितेश तुपट, नवधेष डोंगरे, बाबुराव राऊत कोंढाळा आदी उपस्थित होते.