आरमोरी विधान सभा क्षेत्र कुरखेडा शिवसेनेच्या वतीने शिवसेना चा ५८ वा वर्धापन दीन विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा.. –९ खासदार निवडून आल्याबद्दल पेढे वाटून जल्लोष,शिवसेनेचा आमदार देणार शिवसैनिकांची शपथ…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

 गडचिरोली 

शिवसेना(उ.बा.ठाकरे गट) कुरखेडा च्या वतीने शिवसेनेचा वर्धापन दीन शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शिवसेनेचा वृक्ष भविष्यात असाचा बहरत राहो म्हणून सर्व प्रथम उपजिल्हा रुग्णालय परिसरात व साईबाबा मंदिर परिसरात वृक्ष रोपण करण्यात आले. त्या नंतर साईबाबा मंदिरात शिवसेनेवर भविष्यात कधीही संकटात येऊ नको म्हणून शेकडो शिवसैनिकानी साई बाबांच्या चरणी प्राथना केली.

         या वर्धापन दिना पूर्वी महाराष्ट्रातील जनतेनी लोकसभा निवडणुकीत माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहेब आणि युवा सेना प्रमुख माननीय आदित्य जी ठाकरे साहेब यांच्या हाकेला साद देऊन नव नाही दहा खासदार निवडून देऊन वर्धापन दिना पूर्वी भेट दिली.

        त्या निमित्त कुरखेडा शहरात नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले आणि पुढच्या विधान सभा निवडणुकीत आमदार शिवसेनेचाच राहील आरमोरी विधान सभा क्षेत्रातून शिवसेनेचा आमदार निवडून आणुन पक्ष प्रमुख माननीय उद्वव जी ठाकरे साहेब यांचे हाथ बळकट करू अशी शपथ घेण्यात आली.

         या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक तथा गट प्रमुख आशिष काळे, नगराध्यक्ष अनिता ताई बोरकर ,माजी शहर प्रमुख विजय पाटील पुस्तोडे, युवती सेना अधिकारी प्रा उमा चंदेल ,नगर सेवक जयेंद्र चंदेल ,पाणी पुरवठा सभापती अशोक कंगाली, नगरसेवक तथा माजी उपाध्यक्ष जयश्री रासेकर , नगरसेविका कांता बाई मठ्ठे, कामगार सेना तालुका अध्यक्ष डॉ.अनिल ऊइके ,आमीन पठाण, देवेंद्र मेश्राम ,गोपाल अंबादे ,श्री मडावी आणि बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.