बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
कैंलासवसी विश्वराज विजय घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बावडा तालुका इंदापूर येथील प्रगतिशील बागायतदार विजय मच्छिंद्र घोगरे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पिंपरी बुद्रुक येथील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 वह्या 200 पाणी बाटल , पेन, पेन्सिल, रबर, अंकलपी, असे सर्व शालेय साहित्त्याचे वाटप करण्यात आले. एकुण 7000 हजार रुपये किमतीचे शालेय साहित्याचे वाटप यावेळी सर्व विद्यार्थ्यांनसाठी करण्यात आले.
याबद्दल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय शेंडे गुरूजी, राहुल निर्मळ गुरुजी, रत्नप्रदीप मुधळे गुरुजी, आणि पिंपरी बुद्रुक मधील उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने बावडा येथील विजय मच्छिंद्र घोगरे यांचे या बद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, उप सरपंच संतोष सुतार, माजी सरपंच ज्योती बोडके, माजी उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामपंचायत सदस्य सुनिता शेंडगे, कल्याण बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, सोमनाथ बोडके, रमेश मगर, आशोक बोडके, बाळासाहेब घाडगे, युवराज गायकवाड, ओंकार बोडके, संतोष जगदाळे, वैष्णवी जगदाळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.