युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती कडून अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांचा सत्कार जिल्हा संघाच्या वतीने करण्यात आला .राज्य उपाध्यक्ष व विदर्भ प्रमुख किरण पाटील यांच्या नेतृत्वात खासदार बळवंत वानखडे यांना एक नोव्हेंबर 2005 नंतर लागणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
हा जिव्हाळ्याचा प्रश्न लोकसभेच्या होणाऱ्या अधिवेशनात संसदेमध्ये आपण मांडावा असे प्रतिपादन किरण पाटील यांनी याप्रसंगी केले . अखिल भंडारा जिल्हा संघाची चमू किरण पाटील यांचे भेटीकरीता आली होती. त्या सर्वांचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास पंडितराव देशमुख , श्निळकंठ यावले जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी ,सरचिटणीस सुभाष सहारे ,कार्याध्यक्ष संजय साखरे , कोषाध्यक्ष अशोक चव्हाण , जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ . सुनिता पाटील दर्यापूर तालुकाध्यक्ष सतिश वानखडे सरचिटणीस डी आर जामनिक , शिक्षक बॅक अमरावती चे संचालक संजय नागे मनोज चौरपगार मंगेश खेरडे अचलपूरचे अध्यक्ष मदन उमक सरचिटणीस नितनवरे सर्वश्री रत्नाकर करुले , राजेद्र सावरकर ,सुरेंद्र पतिंगे विजय पवार ,मोर्शी तालुका अध्यक्ष अण्णा कडू, ठवळी भातकुली तालुका अध्यक्ष गजानन निर्मळ सरचिटणीस प्रफुल्ल ढोरे प्रफुल्ल भोरे,गजानन गणोदे, रत्नाकर करुले,विजय पवार,विनायक चव्हाण, बाळासाहेब पावडे ,प्रमोद कुरळकर सतिश नांदणे , शीला जामनिक,सारिका पवार , संगीता साखरे , कल्पना इंगळे , जयश्री वानखडे , कल्पना सावरकर, सीमा नागे ,सुवर्णा ढोरे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. जामानिक यांनी तर आभार प्रदर्शन सतीश वानखडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता दर्यापूर तालुका संघाने विशेष प्रयत्न केले.