महामंडळाचा नाविण्यपूर्ण उपक्रमाने शेतकऱ्यांच्या हिताचे जपणूक होण्याची गरज – सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार   

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

गडचिरोली :- आदिवासी विकास महामंडळ पूर्वी आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी शेतकरी यांचा उत्पादनाला बाजारपेठ मिळावी,मालाला आधारभूत भाव मीळावा याकरीता आविका संस्थामार्फत खरेदी प्रक्रिया राबवित होती मात्र आता यापूढे जात महामंडळाद्वारे शेतकर्यांचा मालाचा साठवणूकी करीता अत्याधुनिक गोडाऊन बांधकाम, मालावर प्रक्रीये करीता उद्योग उभारणी हे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.

       हे स्वागताथार्य असले तरी या उपक्रमाने शेतकर्यांचा हिताची जपणूक होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यानी केले.

          तालूक्यातील आंधळी येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशीक यांचा वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आंधळी येथे धान पीकावर प्रक्रिया उद्योग (राईस मिल) ची उभारणी करण्यात या प्रक्रिया उद्योगाचे उदघाटन आज रविवार रोजी सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचा हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते 

          कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा गजबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक चांगदेव फाये,सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम,आविका संस्थेचे सभापति केशव कीरसान सरपंच दिनकर कूमरे सरपंच उज्वला रायसिडाम महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम एस बावणे, लोमेश उसेंडी, नगरसेवक अॅड उमेश वालदे,खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार,भात गिरणीचे अध्यक्ष बब्बू मस्तान, यशवंत चौरीकर, उध्दव गहाणे उपसरपंच अप्रव भैसारे सूधाकर वैरागडे,मोनेश मेश्राम आदि उपस्थित होते.

     महामंडळाचा वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जिल्हात प्रथमच आविका संस्था मार्फत धानावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे कार्यक्रमाचे प्रस्ताविक आविका उपसभापति विनोद खूणे संचालन मानिक दरवडे तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक हेमंत शेंदरे यानी केले.