दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांवर संस्थेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, संपत सुर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार दिपक पाटील, प्राचार्य दिपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदिप काळे, तसेच आळंदी शहरातील सर्व पत्रकार वृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इ.५वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रवेशोत्स्वाच्या निमित्ताने सचिव अजित वडगांवकर व पत्रकार ज्ञानेश्वर फड, श्रीकांत बोरावके आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.