पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी देसाईगंज/ वडसा
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- विद्यमान तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांनी आपल्या निवडीनंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपल्या मुळ गावात व संपूर्ण तालुक्यात काँग्रेसला भरघोष मते मिळवून देत चांगलीच किमया दाखविली.
राजेंद्र कुसन बुल्ले हे मुळचे कोरेगाव येथिल रहिवासी असून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद मिळविण्यापुर्वी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष पद सांभाळले होते. कोरेगांव येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष पद, जिल्हा काँग्रेस चे सचिव व म.रा.प्रदेश ओबीसी विभागचे संघटक पदा सह देसाईगंज ग्रामीण रूग्णालयातील रूग्ण सेवा समितीचे सदस्य म्हणून त्यांची यशस्वीरित्या पदे सांभाळली.
याचीच फलश्रुती म्हणून त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे तालुकाध्यक्ष पदी निवडणूकी दरम्यान इच्छुकांची संख्या बरीच होती.
मात्र माजी आ. आनंदराव गेडाम यांचे खंदे समर्थक अशी ओळख असल्याने व त्यांच्या कामाची पावती पाहता जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांची नियुक्ती केली होती. गेल्या दिड वर्षात त्यांनी काँग्रेस पक्ष वाढीकरीता संपूर्ण तालुकाभर प्रत्येक गावात कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी निवड केली.
याच दरम्यान त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या सुचनेनुसार तालुकाभर हाथ से हाथ जोडो व जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण घरा-घरात पोहचविण्याचे कार्य केले. वेळोवेळी तालुक्यातील समस्या त्यांच्या मागण्या विचारात घेवून विविध आंदोलने, निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधून लोकांचे कामे करण्यासाठी सहकार्य केले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत नियोजनबद्ध कार्य करीत तालुक्यात काँग्रेसला भरघोष मते मिळवून देण्यात संपूर्ण कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या मदतीने काँग्रेस पक्षाला अच्छे दिन दाखविले.
विशेष म्हणजे त्यांचा मुळ गांव कोरेगांव हे पुर्वीपासूनच भाजपा-शिवसेना बालोकिल्ला म्हणून ओळखल्या जाते तेथे सुद्धा त्यांनी सुरूंग लावत काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविला. येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेसची एकहाथी सत्ता स्थापन करण्यात कसोशिने प्रयत्न करणार असल्याचा आशावाद त्यांनी प्रस्तृत प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.
चौकट
२००७ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत राजेंद्र बुल्ले यांनी कोरेगांव येथील लोकांना सोबत घेऊन स्थानिक ग्राम पंचायत पॅनल लढवली व पहिल्यांदाच ओ.बी.सी. चेहरा म्हणून आपली पत्नी सौ. प्रितीताई बुल्ले यांना उमेदवारी देऊन आपल्या पत्नीसहित ११ पैकी ८ सदस्य एकतर्फी विजय करून आपल्या पॅनलचा सरपंच व उपसरपंच पदावर बसविले.
त्याचवेळी त्यावेळचे आ.आनंदराव गेडाम यांनी कोरेगांव ग्रा.पं.ला भेट दिली असता त्यांचा बुल्ले सोबत परिचय झाला आणि त्यांनी माजी आ.आनंदराव गेडाम यांच्यावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा पासून आतजागायत ते काँग्रेस पक्षात कार्यकर्ता ते पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत.