भागवत महाराज साळुंके यांना “साहित्यरत्न” पुरस्कार जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : वारकरी संप्रदाय व संत विचारांचा प्रसार करणारे आळंदी येथील हभप भागवत महाराज साळुंके यांच्या आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सन २०२४ चा एस.फोर सोल्युशन्स संस्थेच्या माध्यमातून साहीत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “साहित्यरत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे.

         मागील काही वर्षांपासून आध्यात्मिक मराठी संतसाहित्य क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल हभप भागवत महाराज साळुंके यांना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

       एस.फोर. सोल्युशन्स संस्था यांच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न २०२४ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती एस.फोर.सोल्युशन्स या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. हभप भागवत महाराज साळुंके यांनी लहानपणापासूनच वारकरी संप्रदाय क्षेत्राची आवड असून आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेऊन किर्तन व प्रवचन सेवेच्या माध्यमातून संत विचारांचा प्रसार व प्रचार करत आहे.

          शालेय विद्यार्थ्यांसाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमात त्यांचे भरीव योगदान लाभले आहे. त्यांचे नुकतेच “भाव अक्षाराची गाठी” या पुस्तक प्रकाशन झाले आहे. साळुंके महाराज यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, डॉ.नारायण महाराज जाधव, चैतन्य महाराज देगलूरकर, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.