खंडाळा( डुमरी) “आपला आमदार आपल्या सेवी अभियान”अंतर्गत नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न. — १३१ लाभार्थीनी घेतला लाभ…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

        पारशिवनी:- दिनांक ११जून २०२४ रोजी खंडाळा(डुमरी) ता.पारशिवनी येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर खंडाळा(डुमरी) येथिल ग्राम पंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.

        १३१ लाभार्थीनी लाभ घेतले, महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डॉक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.या शिबिरात एकूण-१३१ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-१८ व चष्मे करिता-११३ लाभार्थी यांनी लाभ घेतला.

          याप्रसंगी ग्राम पंचायत खंडाळा ची सरपंच सौ.संध्याताई सर्यामे, उपसरपंच श्री.घनश्यामजी निबोने, श्री.विलासजी ठाकरे, श्री.फत्तेसिगंजी ओतेकर, श्री.प्रभाकरजी प्रधान, श्री.जोगेश्वरजी ओतेकर, श्री.गंगाधरजी बेदरे, श्री.रमेशजी सोमकूवर, श्री.प्रशांतजी सर्यामे, श्री.गोवर्धनजी कोकाटे, श्री.राधेश्यामजी मुस्कुरे, श्री.भागवतजी राऊत, श्री.मनोजजी बागडे, श्री.नरेशजी हिवसे, श्री.संजयजी काळे, श्री.शेषरावजी नाकतोडे, श्री.घनश्यामजी मुस्कुरे, कु.सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

            आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.