कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- दिनांक 11/6/2024 रोजी मंगळवारला श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत पारशिवनी नगरपरिषद अंतर्गत सोनार मोहल्ला येथील माऊली भजन मंडळास भजनासाठी आवश्यक पेटी,टाळ व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
लोकमनात भगवंताविषयी श्रध्दा आणि भक्तीची भावना वाढीस लावण्यासाठी भजनासाठी आवश्यक लागणार्या साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येतो.
याप्रसंगी माऊली भजन मंडळ च्या सर्व सभासद तसेच श्री.प्रकाश डोमकी (माजी सरपंच), श्री.शेखर तरार (पाटील), श्री.सुहास कापसे, श्री.चक्रधर खेरगडे, सौ.सुनीता डोमकी आदी मान्यवर उपस्थित होते.