ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली-लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांचा पराभव झाला. जे महाराष्ट्रात घडले तेच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात घडले. मात्र या पराभवानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपची ताकद दखल न घेण्यासारखी झाल्याची स्थिती असून विरोधकही याच मानसिकतेचे झाले आहेत. अशावेळी भंडारा गोंदियाला प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनीही या मतदारसंघात परिश्रम घेतले मात्र यश आले नाही. अशावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व कायम राहून चांगले दिवस यावेत यासाठी सुनील मेंढे यांना राज्यसभेचे सदस्य देण्यात यावे अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे या उमेदवारीच्या निमित्ताने सुनील मेंढे यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास भाजपाची ताकद वाढण्यास मदत होईल.
दोन खासदारांच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात विकास साधला जाऊ शकेल. भंडारा-गोंदिया पक्ष बळकटीकरणासाठी श्रेष्ठींनी हा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता लावून आहे.
पूर्व विदर्भात नागपूर वगळता सर्व ठिकाणी महायुती पराभूत झाली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात संघटनेला बळकटी देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांना राज्यसभेचे सदस्य दिले जावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. पूर्व विदर्भातील नितीन गडकरींनी महायुतीचा गड राखला परंतु बाकी मतदार संघ गमावले यात भंडारा गोंदिया लोकसभेचा समावेश आहे.मेंढे यांचा पराभव हा राज्यात आलेल्या भाजप विरोधी लाटेच्या परिपाक म्हणता येईल कारण त्यांनी केलेली कामे पराभव व्हावा इतकी प्रतिकूल नाही.
चंद्रपूर गडचिरोली पक्ष संघटनेला बळकटी करण्यासाठी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत रामटेक मतदार संघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः खंबीरपणे उभे आहेत तर अमरावती मतदारसंघात राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे भक्कमपणे उभे आहेत. परंतु भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांना बळ देणारे लोकप्रतिनिधीचे असलेले नेतृत्व नाही.
तसेच भंडारा जिल्ह्यात भाजपचा आमदारही नाही म्हणून पक्ष वळकटीसाठी सुनील मेंढे यांना राज्यसभेचे सदस्य देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्रफुल पटेल यांची रिक्त झालेली जागा व पियुष गोयल व नारायण राणे यांच्या लोकसभा विजय रिक्त झालेले राज्यसभेच्या कोणत्या एका जागी सुनील मेंढे यांना संधी देऊन भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या संघटनात्मक मजबुतीसाठी सकारात्मक निर्णय घेतला जावा असे मत सोशल मीडियातून पुढे येऊ लागला आहे.