ब्रेकिंग न्युज… — राजोली ते नावरगाव रोडवर चारचाकी वाहन पलटी, चालक गंभीर जखमी…

भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

धानोरा तालुक्यातील राजोली ते नावरगाव रोडवर चारचाकी वाहन पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालय धानोरा येते प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.

        सविस्तर वृत्त असे कि राजोली येथून स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच ३३ ए सि ६५७४ ची गाडी नवरगाव कडे येत असताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून पलटी मारली त्यात चालक तुषार महागु वाडगुरे राहणार राजोली वय २५ वर्ष हा गंभीर जखमी झाला.

         त्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले ही घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली