गेल्या 70 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी व राजकारण्यांनी तुमच्यातील धार्मिक आणि विविध जातीच्या कोरड्या अहंकारातील मतभेदाचा लाभ उठवत तुम्हांला मानसिक हतबलतेच्या गुलामीत ठेऊन आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वेगवेगळ्या भितियुक्त वातावरणात ठेऊन तुमच्यावर केंद्रात व राज्यात राज्य केले.
परंतू,दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने यातील काही राजकीय पक्षांनी तुमच्यासमोर तुमची खरोखर काळजी घेण्याचा प्रयत्न करून तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. परंतू , कूटनितीत तरबेज असणाऱ्या पक्षांनी त्यांना लगेच बाजूला करून तुम्हाला पुन्हा कुटनीतीच्या महापुरात वाहवत नेले.
असे गेल्या 70 वर्षात अनुभव आपण सर्वांनी घेतले. हे आपणही ओळखू शकता. मी संशोधन करण्याची गरज नाही….!
परंतू,गेल्या 10 वर्षात देशात आणि सर्वच राज्यात या RSS च्या कुटनीतीच्या सरकारांनी हे राजकारण एवढ्या काही रसातळाला नेऊन ठेवले आहें,की आमच्या बुद्धीजीवी वर्गाची मती गुंग होऊन ती कामच करत नाही……..
“बिचारी जनता तर शेवटी जनताच असते,…..
परंतू,या जनतेलाच आता संविधानातून जागृत होऊन देशाची सर्व सूत्रे हाती घ्यावी लागतील…
आम्ही मोठ्या दिमाखात आणि गर्वाने म्हणतो की,आमची लोकशाही जगात सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ आहें……
परंतू,लोकशाही आहें किंवा नाही,किती टक्के प्रमाणात शिल्लक आहें किंवा नाही हे तपासण्याचे काही मोजमाप ( parameters )आहेत. त्यानुसार आपण आतातरी तपासून पाहिलेच पाहिजे.
लोकशाही तपासण्याचे सर्वात प्रथम मोजमाप म्हणजे त्या त्या लोकशाही देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पहिल्या नागरिकाला ज्या अत्यावश्यक गरजा,आवश्यकगरजा सुखाच्या गरजा,चैनीच्या व विलासी गरजा मिळाल्यात.त्या शेवटच्या नागरिकापर्यंत मिळाल्यात का?
त्यानंतर त्याची ( शेवटच्या नागरिकाची ) सदसदविवेक बुद्धी विकसित करण्यासाठी त्याला विज्ञानवाद + विवेकवाद = मानवतावादी बनण्याची पुरेपूर संधी मिळाली का….?
आणि विशेष म्हणजे स्वतःचे मानवी मुलभूत हक्क जपण्याचे अधिकार वयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर त्याला मिळालेत का.?
किंवा व्यवस्थेने ते मिळवून देण्याची परिस्थिती निर्माण करून दिली का?
या वरील प्राथमिक हक्काच्या विकासानुसार आमच्या लोकशाहीचे मोजमाप केले तर त्याची उत्तरे काय असतील ते आपण तपासून पाहिले पाहिजे..
आमचे प्रधानमंत्री लोकशाहीवादी अमेरिकेत जाऊन पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगतात,की हमारे DNA मे डेमॉक्रॅसी है!
हशा पिकतो……
कारण तत्पूर्वी आमच्या मणिपूरात कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या सहचारिनींची दीडशेच्यावर जमाव नग्न धिंड काढून बलात्कार करतो……….
त्यानंतर मणिपूर आमचे वर्षभर जळत राहते.तरी सुद्धा आमचे प्रधानमंत्री त्या राज्यात साधी भेट सुद्धा देऊ शकत नाहीत…..
या घटनेचे तीव्र पडसाद सर्व जगात उमटतात तरी सुद्धा आमचे प्रधानमंत्री हमारे DNA मे म्हणतात!
आणि आज तर त्याहीपुढे जाऊन याच कुटनीतीचा वापर करून राजकीय पक्षांनी एकमेकात सत्तेसाठी कुरघोडी
करण्याची स्पर्धा निर्माण करून जनतेला कुठलेही महत्व न देता गृहीत धरून आपली सत्ता कशी आणता येईल हेच ध्येय यांनी ठरविलेलं आहें.
केवळ सत्तेसाठी बंड करण्याचे अनेक प्रयोग या महाराष्ट्रात 2022 मध्ये झाले.त्याविषयीच्या थरारक सत्यकथा आज आमच्यापर्यंत पोहचतात.यामध्ये आमदार नितीन देशमुख यांच्यावर मिंधे गटाने सुरत मार्गे गुवाहाटीला नेण्याचे राजकीय षडयंत्र माणुसकीला काळिमा फासण्याचे काम ( त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केल्याची पळून जाऊ नये म्हणून खोटी बातमी पसरवली तरी सुद्धा त्यांनी गुवाहाटीवरून पळून जाऊन पक्षासोबत आपली निष्ठा दाखविली.म्हणजे निष्ठा दाखविण्याचे स्वातंत्र्य सुद्धा या देशात ठेवले नाही का?) या मिंधे गटाने केले……..!
देशात व राज्यात गेल्या दहा वर्षात सत्तेचा सारीपाट मानवी हक्काचे उल्लंघन करून एवढा रसातळाला गेला की बुद्धीजीवी वर्ग तोंडात बोटे घालुनच आश्चर्याने हतबल होऊन पाहत होता.जनता तर बघ्याच्या भूमिकेशिवाय काहीही करू शकत नव्हती.
उलट जनता अज्ञानामुळे असुरी आनंद घेत होती.( लोकशाहीत जनतेची चूक नसते )
शेतकऱ्यांचे न्यायहक्काचे आंदोलन चिरडण्यासाठी 750 च्यावर शेतकऱ्यांना ट्रक्टर घुसवून मारून टाकण्याचे काम येथील केंद्र सरकारने अप्रत्यक्षरित्या केले. हे कृत्य करणाऱ्यावर कधी मनुष्यवधाचे कधी गुन्हे दाखल नाही केले…….
उलट त्यांना पाठीशी घालण्याचे महापाप सरकारनी केले.
देशातील संविधान बदलण्याच्या षडयंत्राला सुद्धा यांनी सुरुवात केली होती……..
त्याची सुरुवात सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती…….
धार्मिकतेचे प्रतिक असलेल्या “सेंगोलची ” मान्यता…..
नवीन संसद भवनाच्या उदघाटनाला राष्ट्रपतीला निमंत्रण न देणे……
(अशा कितीतरी घटना आहेत ज्यांचा उल्लेख येथे करणे वेळेअभावी शक्य नाही.)
अशा मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या घटना घडण्याचा इतिहास या संपूर्ण देशात व राज्यात गेल्या दहावर्षात घडलेला असतांना सुद्धा…….
संविधानविरोधी शक्ती तिसऱ्यांदा सत्तेवर येते……..
म्हणजे ही जादू केवळ EVM च करू शकली……!
लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी,अल्पसंख्यांकाचे हक्क सूरक्षित ठेवण्यासाठी दूरदृष्टीच्या काही बुद्धीजीवी वर्गाने ( सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील संघाने व जनतेने ) EVM ला सुरुवातीपासून विरोध रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढून आकाश पाताळ एक केले, गोदी मीडियाने प्रसिद्धी दिली नाही तो भाग वेगळा.परंतू , निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजही ते अनुत्तरितच आहेत..!
आजही मी याच निवडणूक आयोगाला एकच आवाहन करतो,की,कोणत्याही पाच मतदारसंघात बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन टेस्ट करावी……..
संविधानविरोधी शक्ती नामोहरम झाल्याशिवाय राहणार नाही….
जिथे संविधानविरोधी शक्तीचे राज्यसरकार होते (कोणत्याही कुबड्या न घेता स्वबळावर ) तिथे 99% ते 100% टक्के जागा त्यांच्या आल्या.(गुजरात,मध्य प्रदेश)…!
दिल्ली येथे सरकार जरी आपचे असले तरी तेथील पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय विभाग हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असते )…….
त्याचप्रमाणे काही उमेदवारांना सारखीच मते पाडण्याचे काम EVM ने केले…..!
गेल्या दहा वर्षात केंद्रसरकारने असे खऱ्या विकासाचे कोणते कामे केले….?
जगात आदर्षात्मक कोणते काम केले….?
देशावरचे किती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज कमी केले……?
किती अगोदरच्या चोरांनी देशाला लुटलेल्या चोरांना पकडून आणून शिक्षा दिल्या…..?
एक तर विरोधकांना संपविले,तरी सुद्धा विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विरोधकांना न देता जनतेला सुद्धा मन की बात मध्ये उत्तरे दहा वर्षात का दिले नाहीत….?
आणि तरी सुद्धा याच संविधान विरोधी शक्तीने देशाच्या सत्तेचा तिसरा गियर टाकला ज्याचा क्लच आणि ब्रेक कुबड्यावर अवलंबून आहे……
असा आभास निर्माण करण्यात विश्लेषक आणि विरोधक यशस्वी झालेले आहेत……
प्रत्यक्षात मात्र चित्र उलट आहे.जसे वर्ल्डकप क्रिकेटची फायनल मॅच ही इतरांच्या पराभवावर अवलंबून स्पर्धेबाहेर झालेल्या संघाला अपेक्षा जिवंत असते. अगदी त्याप्रमाणे…..
आणि जनतेची मानसिकताही यापेक्षा वेगळी नाही….!
एकंदरीत अशा अवस्थेत सापडलेल्या देशाला महागाई आणि बेरोजगारीमूळे मानवी हक्काचे उल्लंघन होऊन गरिब आणि श्रीमंतीची दरी निर्माण होऊन पुन्हा एकदा देश स्वातंत्र्याकडून गुलामीकडे कोरोनाच्या गतीने प्रवास करत आहें…..!
या गतीचा वेग कमी करून तिला कायमचे थांबवावयाचे असेल तर कुणालाही दोष न देता,कुठल्याही किंतु परंतूच्या शंका उपस्थित न करता 25 ते 40 च्या वयोगटातील पिढीने राजकारणांच्या व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन युवक -युवतीने ( विशेषतः बहुजन समाजाने आणि संविधाननिष्ठ आक्रमक आंबेडकर अनुयायांनी ) निःस्वार्थपणे सर्व प्रकारच्या संघर्षाने समर्पित होऊन शेवटच्या श्वासापर्यंत काम करणे गरजेचे आहें.
त्यासाठी पुन्हा एकदा मानवतेवर, देशावर आलेल्या संकटाचे आव्हान पेलण्याचे काम करावे लागेल….
त्याची सूरुवात आपण येत्या 15 ऑगस्ट 2024 पासून करणार आहोत केवळ आपल्या तन – मन आणि धनाच्या सहकार्यानेच.
शेवटी सार्वजनिक संकटाचा माउंट एव्हरेस्ट जरी समोर असला तरी त्यातून मार्ग काढून संकटांच्या मानेवर पाय देऊन गरुडझेप घेण्याचा आत्मविश्वास हाच तर खरा बाबासाहेबांनी आणि सर्वच तत्वेत्त्यांनी व महापुरुषांनी आपल्याला दिलेला खजिना आहें.
याचा वापर आता नाही तर कधी करणार?
आव्हानकर्ता आणि जागृतीचा लेखक