कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-हनुमान मंदिर टेकाडी येथे आयोजीत शिवराज्याभिषेक सोहळा राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून सजरा करण्यात आले.
६ जून १६७६ रोजी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्याने भारतात हिंदवी स्वराज्याची सुरूवात झाली.हा ऐतिहासीक दिवस रायगड किल्यावर शिवराज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्या अनुसंगाणे गुरुवार दिनांक ६ जून २०२४ ला हनुमान मंदिर परिसर टेकाडी येथे गणेश राजाराम मस्के यांचे मार्गदर्शनात आयोजीत शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम अंतर्गत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण श्री. सूरेशजी मोहाडे शिवसेना शाखा प्रमुख टेकाडी यांचे हस्ते करण्यात आले.
शिवकालीन अखाडा च्या मुल, मुली यांनी तलवारबाजी, दांडपट्टा,अग्नीकाटी,भालाकाटी या शिवकालीन खेळाचे कर्तब दाखवीत लोकांचे मन जिंकले.
कार्यक्रमाचे संचालन संयोजक गणेश राजाराम मस्के तालुका संघटक यांनी केले.कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित श्री. हरिचंद्रजी हुड, सुरेशजी मोहाडे,मधुकर सातपैसे, नामदेव बोरकर,सुरेश हुड राजेंद्र चौधरी,अशोक राऊत,सचिन वाघमारे,दिलीप गाडगे,कपिल मुर्के,अमोल राऊत, प्रज्वल हुड,वसंता सातपैसे,सूर्यभान कुंभलकर,कैलाश मनगटे,बबन कांबळे,मोहन शेंद्रे,महेश सावरकर व गावातील असंख्य नागरिक व शिवकालीन आखाडा टीमचे खेडाळु प्रामुख्याने उपस्थित होते.