रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर : मंगळवारी लोकसभेचा निकाल जाहीर झाला असुन गडचिरोली-चिमूर लोकसभेत डॉ. नामदेव किरसान निवडुन आल्याची माहिती कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिमूर येथील राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आधार बंगल्यावर पेढे भरवत,गुलाल उधळून अतिषबाजीसह विजयोत्सव साजरा केला.
यावेळी प्रदेश ओबीसी संघटक धनराज मुंगले, माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके,राजु लोणारे,गौतम पाटील,घनश्याम रामटेके,संदीप कावरे,प्रदीप तळवेकर आदीसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.