कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- पारशिवनी वन विभागांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत भागीमहारी अर्तगतमौजा पेंढरी गाव येथे गावकऱ्यांनी अवैधरित्या वनजमिनीवर अतिक्रमण केले होते.
हे अतिक्रमण वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत पारशिवनी यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक एच.एम.वाढई पारशिवनी यांच्या मार्गदर्शनात मौजा पेंढरी येथे सर्वे क्रमांक-२२ वनजमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्यात आले.
तसेच लवकरच वन जमिनीवर असलेले इतर अतिक्रमण हटविण्यात येईल अशी ग्वाही वनविभागातर्फे पारशिवनी वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत याचे व्दारे देण्यात आली.
अतिक्रमण केलेले मोरेश्वर शेंद्रे याचे घरापासून सुरू करण्यात आली आणि यांच्या सह एकुण २० ते २२ लोकांचे इतर अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीस बजावण्यात आले. त्यात त्यांना ७ दिवसांचा वेळ देण्यात आला. ७ दिवसांत स्वतः अतिक्रमण हटविले नाही तर कार्यवाही करण्यात येईल असे बजावण्यात आले.
दरम्यान घरासमोरील मोकळ्या जागेवर जेसीपीच्या माध्यमाने नाल्या खोदण्यात आल्या.
वनविभाग तर्फे अतिक्रमण करणारे गुणाबाई नेवारे, मोरेश्वर शेंद्रे, दीपाली नेवरे, बेबीबाई ठाकरे, वच्छला शेंद्रे, किसना अंबादरे, विकास अंबादरे, सुधाकर शेंद्रे, जिवतू शेंद्रे, दामोजी चाफले, प्रकाश सोनवणे, सुभाष वाघमारे, सूर्यभान राऊत, महादेव ढोरे, आदींचे अतिक्रमण हटविण्यात आले तसेच बाकी लोकाना त्यांना नोटीस बजावून ७ दिवसांच्या आत घरे खाली करण्यास सांगण्यात आले होते .ही कार्यवाही वन विभागाच वरिष्ठ अधिकारी उपवन सरक्षक भरतसिंह हाडा ,सहायक वनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी ए.बी.भगत याचे मार्गदशनात करण्यात आली.
कार्यवाही मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, क्षेत्र सहायक एच. एम. वाढई, क्षेत्र सहायक एन. एम. नगरारे, वनरक्षक पी. एस. वाहने, वनरक्षक स्वप्निल डोंगरे, वनरक्षक प्रवीण पिल्लारे, वनरक्षक उमेश बावणे, वनमजूर बळीराम उके उपस्थित होते.