निवडणूक आयोगाला EVM बाबत माझे काही प्रश्न :- गिरीश पाटील, संगणक तज्ञ, MNC कंपनी, पुणे

▶️ EVM चा सोर्स कोड केंद्र सरकार च्या अखत्यारीत आहे तो सोर्स कोड निवडणूक आयोगाकडे का नाही?

▶️ ज्या दोन एजन्सीज मध्ये (BEL & ECIL) EVM बनते त्या दोन एजन्सीज केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात.(पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग), असे का?  

▶️ भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(BEL) हि कंपनी, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) च्या मदतीने EVM बनवते आणि BEL याच कंपनी कडे EVM चा सोर्स कोड देखील आहे. तसेच हीच कंपनी निर्णय घेते कि कोणते EVM मशीन हे कोणत्या ठिकाणी पाठवायचे असे का? या कंपनीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मनसुखभाई खचरिया सारखे ४ लोक तेही Board of Director पदावर आहेत ते कशासाठी ?

▶️ EVM हॅक करता येत नाही ठीक आहे. आपण ज्याला मतदान केले त्याची पावती स्क्रीन वर दिसते हे पण ठीक आहे. पण EVM च्या डेटाबेस ला आपण दिलेल्या उमेदवारालाच मतदान रजिस्टर झाले याची काय गॅरंटी?कारण निवडणूक आयोग EVM-VVPAT मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही. 

▶️ एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून मूळ EVM रिसेट करून (Re-Programming करून) मतदान केल्यावर VVPAT स्क्रीनवर दाखवायचे एक आणि EVM च्या डेटाबेस ला वेगळीच माहिती अपडेट करणे शक्य आहे.यासाठी EVM हॅक करायची गरज नाही. कारण निवडणूक आयोग EVM-VVPAT मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही. तसेच EVM चा सोर्स कोड केंद्र सरकार च्या अखत्यारीत आहे आणि EVM बनवणाऱ्या कंपनीत भाजपाचे लोक आहेत. त्यामुळे EVM वर शंका का घेऊ नये?

▶️ EVM किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तुमध्ये मध्ये टायमर सेट करता येते. एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून मूळ EVM रिसेट करून (Re-Programming करून), मतदान झाल्यावर टायमर द्वारे ठराविक दिवसानंतर किंवा मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत EVM मधील मतांची अदलाबदल करून सर्वात जास्त मते पडलेल्या उमेदवाराची मते एका विशिष्ट पक्षाला टायमर द्वारे ट्रान्सफर केली जाऊ शकतात आणि जिंकणार उमेदवार हरू शकतो आणि निकाल बदलू शकतो. निवडणूक आयोग EVM-VVPAT मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही त्यामुळे हे शक्य आहे यासाठी EVM हॅक करायची काय गरज आहे? 

▶️ हे ही ठीक आहे कि सर्व पक्षांच्या पोलिंग एजन्ट ला मतदान सुरु होण्याआधी EVM व्यवस्थित सुरु आहे कि नाही हे दाखवले जाते पण पहिल्या ५० किंवा १०० मतांपर्यंत EVM व्यवस्थित काम करेल पण १०० मतांनंतर इतर पक्षांना पडलेल्या दर ५ मतांमागे किंवा ५० मतांमागे एक मत याप्रमाणे एका विशिष्ट पक्षाला EVM मध्येच एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून (Re-Programming करून) ट्रान्सफर केले जाऊ शकते. यासाठी EVM हॅक करायची गरज नाही. कारण निवडणूक आयोग EVM-VVPAT मध्ये पडलेल्याला १००% सर्व चिठ्यांची मोजदात करत नाही. 

▶️ EVM मध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरून एखाद्या पक्षाचे चिन्ह स्कॅन केले जाऊ शकते आणि त्याच चिन्हाचा पक्ष कसा विजयी होईल हे देखील करता येईल.

▶️ EVM मधील सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग व्यवस्थित आणि १०० टक्के बरोबर चालते याचा काय पुरावा निवडणूक आयोगाकडे आहे? आपण दिलेले मत आपल्याच उमेदवाराला EVM च्या डेटाबेसेला रजिस्टर झाले आहे हे सामान्य जनतेला कसे समजणार?

▶️ चंदीगड महापौर निवडणुकीत On कॅमेरा मतांची चोरी केलेली दिसली मग निवडणूक आयोग आणि EVM कंपनी सत्ताधाऱ्यांच्या हातात असेल तर त्यात छेडछाड होणार नाही याची काय गॅरंटी?

▶️ साधा घरातील TV रिमोट ने ऑपरेट करता येतो, आपली गाडी १००/२०० मीटर वरून अनलॉक होऊ शकते, आपल्या देशातील बँकांची खाती हजारो किलोमीटर दुरून हॅक करून पैसे लुटला जातो, पेगॅसिस सॉफ्टवेअर चा वापर, रोज वेगवेगळ्या नवीन सायबर क्राईम च्या घटना घडत आहेत, BEL कंपनीत मध्ये भाजपाची लोक, तर मग EVM मध्ये छेडछाड शक्य नाही हे पटण्यासारखे तर नाहीच पण हास्यास्पद देखील आहे. 

▶️ स्वतः उभे राहिलेल्या उमेदवाराला देखील शून्य मते पडल्याचे बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आले आहे. हे कसे शक्य आहे?

▶️ चोरी पकडली जाऊ नये, प्रत्येक वेळी विरोधकांचा पराभव होऊ नये यासाठी सर्व EVM मशिन्स Faulty न बनवता १० टक्के ते ३० टक्के EVM जाणून बुजून Faulty(खराब) बनवली असण्याची शक्यता आहे, कारण EVM चा सोर्स कोड केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारी BEL हीच कंपनी ठरवते कोणते मशीन कोणत्या ठिकाणी पाठवायचे ते त्यामुळे कोणत्या राज्यात कोणता पक्ष विजयी करायचे हे EVM च ठरवनारं आणि त्यामुळेच विरोधी पक्षांना प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागत नाही.  

▶️ EVM च्या सुरक्षेबाबत कसा विश्वास ठेवायचा? याआधी भाजप नेत्याच्या गाडीत EVM मशीन सापडले? शिवाय काही दिवसापूर्वी पुण्यातून EVM च्या चोरीची घटना देखील घडली आहे. याचा अर्थ EVM च्या अंतर्गत तांत्रिक प्रणाली ची / सोर्स कोड ची माहिती लीक झाली असू शकते. त्यामुळे या चोरी नंतर सर्व २० लाख EVM मशिन्स का बदलली गेली नाहीत?

▶️ मतदान झाल्यावर EVM ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात ती ठिकाणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत न येता केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतात. हे योग्य आहे का?

▶️ मतमोजणीसाठी एक दिवस जास्त लागला तरी चालेल पण लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरच हवे. EVM येण्याच्या अगोदर उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतरच बॅलेट पेपर / मतपत्रिकांची छपाई पुढील ८ दिवसात होत होती मग आता काय अडचण आहे?

▶️ प्रगत देशांना देखील EVM चे दुष्परिणाम समजले आहेत. पारदर्शकतेच्या अभावामुळे प्रगत देश (अमेरिका, UK, कॅनडा, जर्मनी, जपान, UAE ) बॅलेट पेपरच निवडणुका घेत आहेत. बांगलादेश, नॉर्वे, पाकिस्तान, मलेशिया यांसारखे देशही बॅलेट पेपरच निवडणुका घेत आहेत. मग जगातील मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात EVM हटवून बॅलेट पेपर वरच निवडणुका का घेतल्या जात नाहीत?

▶️ इतके सर्व पक्ष, उमेदवार, जनता EVM च्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेत असतील तर EVM मधील मतदान आणि VVPAT मधील १०० टक्के चिठ्यांची मोजदात करून Tally करायला निवडणूक आयोगाला काय अडचण आहे? निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का?