जितेंद्र आव्हाडांचा भाजपातर्फे निषेध… — खासदार सुनिल मेंढे यांच्या नेतृत्वात कार्यवाहीसाठी दिले निवेदन…  

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून त्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी च्या वतीने खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनातून केली आहे. यावेळी एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.

            महाड येथे मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले. संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून आव्हाडांनी त्यांचा घोर अपमान केला आहे.

           हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे आणि घृणास्पद असून जितेंद्र आव्हाडांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारे आहे, असे म्हणत आज भाजप भंडारा जिल्हा, तालुका, शहर यांच्या वतीने आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

            शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून आव्हाडांच्या फोटोला जोडे मारले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन दिले.

          आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

             निवेदन देताना रामकुमार गजभिये, विनोद बांते, सचिन कुंभलकर, आशु गोंडाने, मंगेश मेश्राम, सूर्यकांत ईलमे, नितीन कडव, रुबीजी चढ्ढा, सचिन तिरपुडे, शंकर लोले, विलास लिचडे, रवींद्र वंजारी, विष्णूदास हटवार, गोवर्धन साकुरे, सुखदेव वंजारी, प्रशांत निंबोळकर, अतुल वैरागडकर, चंद्रकला भोपे, साधना त्रिवेदी, रोशनी पडोळे, वर्षा साकोरे, ज्योती साबळे, जया हिंगे, मनीषा भुते, अर्चना श्रीवास्तव, श्रद्धा डोगरे, यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.