ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – नागझिरा अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर घनदाट अरण्यात वसलेले छोटेसे गाव पिटेझरी शेती, वनमजुरी व नागझिरा अभयारण्याचा नैसर्गिक वातावरणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविणे हेच येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन.
पिटेझरी हे गाव वनांच्या सानिध्यात असल्यामुळे गावात प्राथमिक शिक्षणाशिवाय कोणतीही शिक्षणाची सोय नाही त्यामुळे मुलभूत शिक्षणाचा प्रचार व प्रसार अल्पच परंतु बदलत्या काळातील दळणवळणाच्या सुख सुविधांचा वापर करून ईथल्या शेतकरी, कष्टकरी पालकांनी प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी साकोली येथील जनसामान्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सर्व बाबींनी संपन्न असणाऱ्या नंदलाल पाटील कापगते विद्यालयाची निवड करतात.
नंदलाल पाटील कापगते कनिष्ठ महाविद्यालय हे इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, कृषी शास्त्र अशा अनेक शाखांतून व्यवसायिक शिक्षण देणारी जिल्ह्यातील अग्रगण्य कनिष्ठ महाविद्यालय आहे. दहावी नंतर पुढे अकरावी व बारावीसाठी याच विद्यालयात एच.एस.सी. व्होकेशनल (एम.सी.व्हि.सी.) अभ्यासक्रमाची निवड करून सर्व विद्यार्थी उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाले.
यातील कु.साक्षी पंधरे 75.17%, कु. पुष्पा टेकाम 66.83% व कु. जागृती निवारे 60.18% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. पीटेझरीच्या या विद्यार्थिनींचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रसिका कापगते, प्रा. कैलास लोथे, प्रा.नागोसे, राजेश खोटेले, दिगंबर देशमुख ,धनंजय तुमसरे, रेखराम दिघोरे व इतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले तसेच या सोहळ्यामध्ये “पाखर शाळा” च्या संचालिका सौ पुरंदरे मॅडम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.