कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी::- रीआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,आकाशझेप फाऊंडेशन व लाईफ लाईन ब्लड सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने दि. २५ मे २०२४ ला अंगणवाडी परिसर वनेरा ( घाटकुकडा) येथे मोफत आरोग्य तपासणी,औषध वितरण व रक्तदान शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष व रीआन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर, प्रमुख पाहुणे डॉ. वैशाली बोरकर (रीआन हॉस्पिटल), आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार, ॲड. प्रफुल्ल अंबादे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.सुनील वरठी,ढवळापूरच्या सरपंच प्रीतीताई मिथुन उईके,कोलीतमारा येथील सरपंच रामकलीताई मंगल उरमाले,माजी उपसरपंच विठ्ठल पाटील,ढवळापूरचे माजी सरपंच चंदू भलावी,पत्रकार नत्थु घरजाळे,राज चव्हाण हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशझेपचे सचिव व भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले.
या शिबिरात वनेरा,नरहर, कोलीतमारा,ढवळापूर,घाटकुकड,घाटपेंढरी येथील १४७ आबालवृद्धांनी आरोग्य तपासणी व औषधी वितरण सेवेचा लाभ घेतला.
उन्हाच्या तडाख्यातही ११ व्यक्तींनी रक्तदान करून मानवतेचा कृतिशील संदेश दिला. लाइफ लाइन रक्तपेढीचे विशाल घोडेस्वार,इफ्तेखार हुसैन, भारत हिरोळे, देवयानी सेलुकर, अंकिता बोंदरे यांनी रक्तसंकलन केले.
रीआनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली ठाणेकर, डॉ. संतोष कुमार नागेश्वर, विपीन बंसोड, परिचारिका मेघा फुटाणे, विजया मेश्राम, अलीशा डहारे, दिपीका मरगम, आनंद मिश्रा यांनी वैद्यकीय तपासणी व औषधी वितरण उत्तमरित्या केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान सोमकुवर, मनोरमा सोमकुवर, कंचना शेंदरे, रामचंद शेंदरे, समीर शेंदरे, लता भलावी, अबोली उईके, सपना शेंदरे, देवचंद सोमकुवर, दिव्यानी शेंदरे, मंगलसिंग उरमले, गजानन सोमकुवर, शेषराव तुमडाम, संजय मडावी, माणिक कुमरे अंतू उईके, अर्जुन भलावी, जयराम कुमरे यांनी प्रयत्न केले.