संस्कार ज्युनिअर कॉलेज चा १००% निकाल…

       राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित स्थानिक संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथील विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवीत संस्कार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० % निकाल लागला असून मंगेश मारोती वाढई यांने ७१.५०% घेत कालेज मधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक तिलक संतोष ठलाल तर कॉलेजमधून तृतीय क्रमांक ईशू प्रमोद मेश्राम हिने पटकावलाय आहे.

           ‌ विज्ञान शाखेत परिक्षेला बसलेल्या ४० विद्यार्थी पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून निकाल १००% टक्के लागला असुन मागिल पाच वर्षां पासून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

         यावेळी आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, महाविद्यालयात होणारे नियमित वर्ग, नियमित चाचण्या महाविद्यालयात मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, महाविद्यालयातील मोफत वायफाय, यामुळेच हे यश प्राप्त करता आले. असे विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

        या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये संस्था सचिव दोषहरराव फाये संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये, प्राचार्य देवेंद्र फाये व प्राध्यापक व प्राध्यापिका व आई वडील यांना दिलेले आहे.

          या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मोहनजी अरमरकर संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, उपाध्यक्ष गजानन येलतुरे संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये, संस्था सदस्य इंजिनिअर गुणवंत फाये,शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये, विमलताई फाये, वर्षाताई फाये व महाविद्यालयाचे प्राचार्य लिलाधर बडवाईक, प्राचार्य देवेंद्र फाये, व,संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारणी मंडळ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले आहे.