वॉइस ऑफ योजना दर्पण तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण… — समाजभूषण डी जी रंगारी यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

        साकोली – खैरलांजी येथे नागार्जुन बौद्ध विहार येथे तथागत बुद्ध जयंती चे औचित्य साधुन वॉइस ऑफ योजना दर्पण च्या भंडारा जिल्हा टीम कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

             सर्व प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण समाजभूषण व पत्रकार डी.जी रंगारी यांचे हस्ते करून सामुहिक बौद्ध वंदना घेण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम यांची उपस्थिती होती‌.

           शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाला सरपंच पूजा देशमुख, पोलिस पाटिल आदित्य मेश्राम, नागार्जुन बुद्ध विहार समिति चे अध्यक्ष चुननेश्वर मेश्राम, सर्वांगीण शिक्षण हाईस्कूल पिंडकेपारचे संचालक अमोल हलमारे, ग्राम पंचायत सदस्य कविता जांभुळकर, व्हॉइस ऑफ योजना दर्पण ब्युरो चिफ किशोर खोब्रागडे, जितेंद्र मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल व खोडरबर या साहित्याचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 

           कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चारुशीला मेश्राम(प्रेस रिपोर्टर)निवांत देशपांडे, चेतन रामटेके, रामभाऊ जांभुळकर, सुनील मरसकोल्हे, प्रतिक बडोले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र मेश्राम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नागार्जुन विहार समिती चे अध्यक्ष चुनेश्वर मेश्राम यांनी केले.