जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात…

       रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहाराचे वतीने “बुद्ध पौर्णिमा”मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

         कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

           त्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्रिशरण पंचशील आणि धम्म शिकवणुकीचे मान्यवरांकडून मार्गदर्शनानंतर खीरदान करण्यात आली.

           या त्रिवेणी मंगलमय प्रसंगी बौद्ध जनातील उत्साह, आनंद द्विगुणित झाला होता. समता, करुणा, विज्ञानवादी दृष्टीकोनातून मंगलमय जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या मार्गदात्याला, तथागताला मनोभावे अभिवादन करण्यास आलेल्या उपस्थित जनसमुदायचे आभार माणून कार्यक्रमाची सांगता झाली.