कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – अवघ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे.. दया, क्षमा,शांतीची शिकवणूक देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती कन्हान शहर विकास मंच द्वारे गणेश नगर येथील बुद्ध बिहारात साजरी करण्यात आली.
या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे आणि सदस्य अभिषेक चवरे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी भरत सावळे,अर्जुन पात्रे यांनी तथागत गौतम बुद्ध यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन बुध्द जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.कार्यक्रमास उपस्थित सर्व शहर विकास मंच पदाधिका-यानी व सदस्यांनी,तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,मार्गदर्शक भरत सावळे, प्रदीप बावने, सुरज वरखडे, अर्जुन पात्रे, माहेर इंचुलक र, अभिषेक चवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.