सुमेध बुद्ध विहार एकोडी मध्ये बुद्ध जयंती सोहळा संपन्न…

ऋग्वेद येवले

उपसंपादक

दखल न्युज भारत

      साकोली – वैशाख बुद्ध पोर्णिमे निमित्ताने सुमेध बुद्ध विहार एकोडी या ठिकाणी बुद्ध जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

         सुरुवातीला महाकरूनिक तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.

         त्या नंतर ध्वजारोहण करण्यात आले, व भन्ते नागरत्न यांच्या कडून बुद्ध वंदना, धम्मदेशना घेण्यात आली.

         या प्रसंगी धवजारोहण ग्रामपंचायत एकोडी सरपंच संजय खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच उपसरपंच रिगण राऊत,माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड, कुंदा जांभूळकर, शारदा बावणे, रहिला कोचे ,रमेश खेडीकर, भास्कर चिरवतकर,उपस्थित होते.

          बुद्ध जयंती निमित्ताने महेश राऊत व कमलेश भैसारे यांचे कडून शरबत वाटप तसेच माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांचे कडून खीर वाटप करण्यात आली.

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमेध बुद्ध विहार समिती सचिव कार्तिक मेश्राम उपाध्यक्ष सुबोधकांत कोटांगले, मनोज कोटांगले, एकनाथ कोटांगले, रघुनाथ मेश्राम, कैलास जांभूळकर,तीर्थानंद बोरकर, रेखलाल जांभुळकर, विनायक भैसारे, अमित भैसारे, तेजस कोटांगले, मिलिंद बडोले,गोपीनाथ मेश्राम,झिंगर थुलकर, ओमप्रकाश जांभूळकर मोहिनी कोटांगले, पुष्पा मेश्राम, हिना कोटांगले, कौशल्या कोटांगले, वछला जांभूळकर, ललिता कोटांगले, यशोधरा कोटांगले, सलीता जांभुळकर सर्व बुद्ध उपासक उपसिका उपस्थित होते.