बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या लक्ष्मी नरसिंह उत्सवा निमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मैदान गुरवार दिनांक 23/5/2024 रोजी दुपारी 2 वाजता कुस्ती आखाड्याचे पूजन ग्रामस्थांच्या हास्ते करून कुस्त्याला प्रारंभ होणार आहे .तर राज्य व राज्याबाहेरून आनेक कुस्ती मल्ल पैंलवान व प्रेक्षक 5 हजाराहून अधिक संख्येने उपस्थित राहणार.
यामुळे संपूर्ण गावामध्ये स्वच्छता करण्यात आलेली आहे. सरपंच नितीन सरवदे मीडियाशी बोलत आसताना म्हणाले की? लक्ष्मी नरसिंहाच्या उत्साहासाठी आलेल्या भाविकांना व कुस्ती शौकिनांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत. व नामांकित आलेल्या पैलवानांचा व प्रमुख नेते मंडळींचाही यात्रा कमिटीच्या वतीने आखाड्या मध्ये सन्मान करण्यात येणार आहे. सरपंच नितीन सरवदे यांचे उद्गार..
कुस्ती मैदानामध्ये 50 (पन्नास)रुपये पासून ते 1 (एक लाख) रुपये इनाम पर्यंतच्या निकाली कुस्त्या जोडण्यात येणार आहेत.तसेच या आखाड्यामध्ये कुस्त्या जोडण्याचे काम, महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट पैंलवान रावसाहेब (आपा)मगर मगराचे निमगाव यांचीही प्रमुख उपस्थिती कुस्ती मैदानामध्ये आहे. नरसिंहपूरचे वस्ताद सचिन कदम व सरपंच आण्णासाहेब काळे सांगत होते.
आयोजक नीरा नरसिंहपुर यथील विद्यमान सरपंच अर्चना नितीन सरवदे सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, आजी माजी सरपंच, उपसरपंच व यात्रा कमिटी अध्यक्ष विठ्ठल धोत्रे, उपाध्यक्ष उमेश घोडके, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व नरसिंहपूर येथील सर्वच ग्रामस्थ यांच्या संयुक्त पुढाकाराने निकाली कुस्त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
लक्ष्मी नरसिंह जयंती उत्सव हा सालाबाद प्रमाणे साजरा होत असून या निमित्त निकाली कुस्त्याच्या जंगी मैदानाचा मुकाबला आखाड्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकणार आहे.
लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत कुस्ती मल्ल पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, आशा आनेक जिल्ह्यातू नामांकित कुस्तीमल्ल पैलवानांची हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार. नरसिंहपुर येथील यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या ठिकाणी विशेष सन्मान व मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहेत.
नरसिंहपूर येथील निकाली कुस्त्याच्या निवेदनासाठी, संपूर्ण राज्यामध्ये ओळख निर्माण झालेले पैंलवान युवराज (तात्या) केचे यांची या कुस्ती आखाड्यासाठी प्रमुख निवेदक म्हणून उपस्थित आहे.