चकपीरंजी येथे जैविक, सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

         संपूर्ण राज्यात सेंद्रीय शेती धोरण राबवून विषमुक्त अन्न उत्पाद्दीत करून पर्यावरण, जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी करणे तसेच शेतकऱ्याचा उत्पादनवरील खर्च कमी करण्याचे हेतूने सन 2023-24 पासून डाँ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सावली तालुक्यात प्रती शेतकरी गट 50 हेक्टर क्षेत्राचे 10 गटांची निवड करून 500 हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती प्रकल्प राबविण्यात येत आहे.

           प्रकला अंतर्गत निवड केलेल्या शेतकरी गटांना योजनेतून 3 वर्षाकरिता नैसर्गिक शेती बाबत तांत्रिक व निविष्टा तयार करणेकरीता प्रशिक्षण व साहित्य तथा निविष्ठा पुरवठा करण्यात येणार असून सहभागी शेतकऱ्यांच्या शेताचे व उत्पादनाचे प्रामाणिकरन करण्यात येणार आहे.

         तालुक्यात सादर प्रकल्प राबविण्याकरीता साईश्रेया शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांची निवड करण्यात आली असून शेतकरी गटांना सादर कंपनीसी जोडण्यात आले आहे.

              याच अनुषंगाने नुकतेच चकपीरंजी येथे चकपीरंजी व केशरवाही येथील शेतकऱ्यांचे गटस्थरीय नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

          प्रशिक्षणाचे अध्यक्ष स्थानी यजमान शेतकरी उत्पादक कंपनीच्या सी. ई. ओ. श्रीमती अल्काताई स्वामी तर उदघाटक म्हणून आत्मा प्रकल्प संचालिका श्रीमती प्रीती हिरळकर यांची, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषि अधिकारी दिनेश पानसे यांची उपस्थिती होती.

          आत्मा संचालिका प्रीती हिरळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना योजनेबाबत माहीती देऊन शेतकऱ्यांनी स्वतःचे कुटुंबाचे आरोग्यासोबत पर्यावरणाचे जतन करण्याकरिता सामाजिक बांधलकी म्हणून स्वयमस्फूर्तीने नैसर्गिक शेती अभियानात सहभागी होण्याचे आव्हान केले.

            दिनेश पानसे यांनी तांत्रिक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना सेंद्रिया नैसर्गिक शेतीचे महत्व व कार्यपद्धती, विविध शेंद्रीय निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती व त्यांचा वापर, नैसर्गिक शेतीची 10 ड्रम थेरी तसेच खरीप हंगाम व कृषि विभागाच्या योजना याबाबत सविस्तर माहीती दिली.

          प्रसंगी ए. टी. एम. श्री अमित हातझाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क, जीवामृत, मॅट्यारायझियम द्रावण, बिजामृत व निंबोळी अर्क यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

          कार्यक्रमास शेतकरी कंपनीचे संचालक श्री अनिल स्वामी, महाबीज चे वेवस्थापक श्री फुलझेले, कृषि पर्यवेक्षक सचिन जाधव, कृषि सहायक प्रदीप जोंधळे, पवन ठाकरे यांची उपस्थिती होती.

            कार्यकर्माचे प्रास्ताविक श्री पानसे, संचालन बी. टी. एम. श्री कावळे तर आभार प्रदर्शन श्री जोंधळे यांनी केले.बहुसंख्य शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.