ग्रामपंचायत एकोडी येथे जागतिक डेंगू दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

साकोली : ग्रामपंचायत एकोडी येथे जागतिक डेंगू दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथील आरोग्य सहाय्यक वाय. व्ही.अहिर यांनी डेंगू आजाराबद्दल डेंगू रोगाची लक्षणे काय, चिन्ह काय, त्यावर उपाययोजना काय व कशी करावी याची माहिती दिली.

         तसेच आरोग्य सहाय्यक घाटबांधे यांनी डास निर्मूलनाची सर्वाना शपथ देण्यात आली. तसेच आरोग्य सेवक यांनी सर्वांचे आभार मानले.

       जागतिक डेंगू दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, तर उपस्थित उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, कुंदा जांभुळकर, आशा बडवाईक,रहिला कोचे , व ग्रामपंचायत मधील कर्मचारी दिलीप चौधरी, अमित भैसारे, शेषराज मेश्राम व गावकरी उपस्थित होते.