साकोलीत रुपयांसाठी कुणाचे दुःखही न समजणारे त्या हॉस्पिटलचे ते डॉक्टर? — बाळ तर मृत्यू पावले पण एक रुपयाही सोडला नाही,संतप्त पतीची मिडीयाला वेदनादायक प्रतिक्रिया…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

साकोली : आजच्या दुनियेत फक्त पैशाला मायबाप आहेत,पैशांसाठी मात्र एका मृत झालेल्या चिमुकल्यांच्या आईसोबत घडलेली साकोलीच्या एका खाजगी दवाखान्याती घटना मन शून्य करणारी ठरली.तद्वतच सामान्य कुटुंबातील दुःख ही रुपयापुढे दिसत नाही,असे पैसा पैसा करणा-या काही आलीशान हॉस्पिटलमध्ये संतप्त झालेल्या एका आईवडीलांना आलेला एक अनुभव कथन केला आहे साकोली मिडीयावर. 

      साकोली निवासी व सध्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्यांचे भाचा आणि दिवंगत डॉ.गिरीश फुंडे यांचे भाचा मनोज डोये यांनी आपल्या पत्नीला गोंदिया जिल्ह्यातील एका तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलला दि. १० मे रोजी दाखल केले होते.उच्च रक्तदाब असलेल्या पत्नीचा उपचार सुरू झाले.पण बाळाचा तेथील खाजगी हॉस्पिटललाच मृत्यू झाला. 

          नंतर तिथे सिझर करण्याची व्यवस्था नसून साकोलीतील एका जून्या वस्तीतील खाजगी हॉस्पिटलला सिझरसाठी आणन्यात आले.

        बुधवार १५ मे रोजी स. ११:३० ला महिलेची सुट्टी झाली. या कुटुंबीयांनी तेथील डॉक्टरांना विनंती केली की अगोदरच बाळ गेल्याचे दुःख झाले आहे,एक माणूसकीच्या नाते काही बिल कमी करावे. 

       परंतु तेथील महिलेच्या पतीने बालमित्र असलेल्या पत्रकार प्रतिनिधीला याबाबद सांगितले व तेथे बोलवून घेतले. यामध्ये हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की “आता तर चार चौघात व पत्रकारांना ही गोष्ट का सांगत आहात,जास्त ओरडू नका अन्यथा पोलीसांना फोन करेल” म्हणून आता तर आम्ही एकही रूपये कमी करणार नाहीत” सदर सामान्य कुटुंबातील या पती पत्नीने कसेतरी एकुण मेडीकल चे ५००० हजार व हॉस्पिटलच्या खर्चाचे १९,९०० असे एकुण २५ हजार रुपये काऊंटरवर मोजून दिल्यावरच त्या बाळ मृत्यू पावलेल्या महिलेस डिस्चार्ज देण्यात आला. 

        या डोये परीवाराचा संतप्त सवाल हा होता की,जर बाळ असते तर आम्ही खुशीने हे बिल व अजून आनंदाने अधिक दिले असते.पण येथे माणूसकी विसरले असून कुणाच्या दुःखीमय भावनेला पैशांनी मोजू नये. 

         तर या जगात पैशे कमविण्याचे भरपूर उद्योग आहेत.पण कुण्या आईच्या मातृत्वाला दुःखाचा डोंगर कोसळले असता त्यांचा पूरेपूर गैरफायदा उचलू नये.हि माणूसकी नसून एका साकोलीच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये निव्वळ पैशे कमविण्याचा धंदा कुणाचे मने दुखवून करू नये असा संतप्त आरोप साकोली मिडीयाला मनोज लक्ष्मीकांत डोये रा. ओवारा,तह. देवरी जि. गोंदिया यांनी केला असून,नागरिकांनी अश्या लूटमारांपासून सावध रहाण्याचेही आवाहन केले आहे की दूस-या गोरगरीबांना हा पैशांचा फटका बसू नये व लूबाडले जाऊ नयेत.