ऋग्वेद येवले
उपसंपादक
साकोली – नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कूल (सीबीएसई) साकोली येथे १४ दिवसीय उन्हाळी शिबीराचे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थती डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर, रवी रंगारी धनुर्विद्या प्रशिक्षक, पर्यवेक्षिका वंदना घोदीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व शिबीर प्रमुख सतिश गोटेफोडे उपस्थित होते.
विद्यार्थ्याच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक तसेच सर्वागीण विकासाकरिता उन्हाळी शिबीर अत्यंत आवश्यक असून स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी यातून तयार होणार, तसेच इच्छाशक्ती असेल तर विद्यार्थी हा प्रत्येक स्पर्धेत टिकेल व शाळेचे नाव मोठे करेल व हे सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी उन्हाळी शिबीर उपयुक्त असते असे प्रतिपादन प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी केले.
या उन्हाळी शिबीरातील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रवासात उपयोगी पडेल. या उन्हाळी शिबीरामध्ये योगा, कराटे, डॉज बॉल, वूड बॉल, थ्रो बॉल, व्हॉली बॉल, आर्चेरी, एअर रायफल शुटींग, भाला फेक, थाली फेक, शास्त्रीय नृत्य, चित्रकला, लहान मुलांसाठी विविध मैदानी खेळ या सारखे विविध उपक्रम कला कौशल्य मुलांनी आत्मसात केलीत.
ठाकूर सरांनी धनुर्विद्या कशी करायला पाहिजे याची माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन सुनीता बडोले व आभार शालिनी धूर्वे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.